राहुल तसा अभ्यासात जास्त हुशार जरी नसला तरी त्याला दुनियादारीच्या गोष्टी त्याला खूप समजत होत्या समजदारी त्यात खूप भरलेली होती। लहानपणा पासून घरचे आर्थिक नियोजन त्याने चांगले सांभाळले होते त्यामुळे त्याचा आईवडीलाचा कामाचा भार थोडा हलका झाला होता घरी चांगल्यापैकी आर्थिक सुबत्ता होती. किराणा, बाजार , बँक व्यवहार, विम्याची काम सगळे तोच करायचा त्यामुळे त्याला सगळ्या आर्थिक गोष्टी ची माहिती झाली अन त्यामुळे साहजिक त्याचा शैक्षणिक ओढा हा वाणिज्य शाखेकडे गेला. बारावी नंतर त्याने वाणिज्य शाखा घेण्याचा विचार घरी बोलून दाखवला घरी त्याला तुला आवडत आहे ना कर म्हणून सांगितले घरच्यानी त्याला जास्त अडसर केला नाही . कॉलेज सुरू झाले