इश्क – (भाग ७)

(17)
  • 9.5k
  • 1
  • 4.2k

राधा उठुन आपल्या रुमकडे निघाली आणि कबीरच्या मनात प्रचंड चलबिचल सुरु झाली. काय करावं? काय करावं म्हणजे राधाला थांबवता येईल. कसंही करुन कबीरला राधाला नजरेआड होऊ द्यायचं नव्हतं. राधा जेथे कुठे जाणार आहे, तेथे तेथे आपण सुध्दा तिच्या बरोबर जावं?पण राधा का म्हणुन आपल्याला बरोबर घेऊन जाईल? राधाला सांगावं की फोन निट चालू झालाचं नव्हता?पण तिने बघीतला होता फोन चालु झालेला, आणि आपल्या सांगण्यावर ती का विश्वास ठेवेल, तिला तिचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे.. काय करावं..? कबीरची मतीच गुंग झाली होती. “राधा…”“हम्म?” “राधा.. आय एम सॉरी..”“कश्याबद्दल? आय मीन कश्या-कश्याबद्दल?”, काहीसं हसुन राधा म्हणाली..“ते मी सकाळी तुला.. ते गेटपाशी म्हणालो… आय-लव्ह-यु.. ते