ट्रेन डिलिव्हरी

  • 8.3k
  • 1
  • 2.1k

मधु (भटका समाज म्हणून वडार समाजाची पूर्वपार ओळख आहे. महाराष्ट्राबाहेरील उगमस्थान असलेला वडार समाज महाराष्ट्रात स्थलांतरित झाला. वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्या नां वडरवाडा असं म्हणतात, वर्षानुवर्षे हा समाज दगड फोडण्याचे काम करतो. शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे हालअपेष्ठा जणू पाचवीला पुंजलेली. अश्याच समाजातल्या मधु नावाच्या मुलीची कि काल्पनिक कथा) गावाच्या बाहेर पार ४-५ कोस दूर वडरवाडा आहे. लोकसंख्या म्हणजे गावाच्या मानाने जेमतेम,पण आसपासच्या वडारवाड्या पेक्षा जास्त. त्यात २५-३० कुटुंब आपल्या मोडक्या तोडक्या झोपडीत राहायची. तेच म्हणजे त्यांचा बंगला. २ वेळेला पोटाला अन्न मिळालं म्हणजे घरी दिवाळी चा आनंद. काम केलं तर दाम आणि दाम मिळालं तरच घास अस त्याचं