इश्क – (भाग ६)

(18)
  • 9.9k
  • 4.4k

राधा गेट उघडतच होती तोच समोर एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षावाला पटकन उतरला आणि त्याने रिक्षातुन सोफी ऑन्टींना हात धरुन खाली उतरवले. सोफी ऑन्टींच्या हाताला आणि कपाळाला थोडं खरचटलं होतं. ते बघताच हातातली बॅग टाकुन राधा धावत रिक्षेपाशी गेली. कबिरही काय झालं बघायला मागोमाग धावला. “सोफी ऑन्टी ! काय झालं?” राधाने त्यांचा हात धरत विचारलं..“काही नाही ताई.. त्या रिक्षेतुन चालल्या होत्या, म्हापसा चौकात मध्येच एक मोटारसायकलवाला आला, त्याला वाचवण्याच्या नादात रिक्षा उलटली..”“अहो काय.. निट चालवता येत नाही का रिक्षा तुम्हाला..? माजलेत तुम्ही लोकं…!!”, राधा तावातावाने बोलली“ताई, अहो माझ्या रिक्षेत नव्हत्या त्या.. दुसरी रिक्षा होती. तो गेला पोलिस स्टेशनात.. मी विचारलं