मात भाग १

(15)
  • 42k
  • 2
  • 30.8k

रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. अजुन कसा आला नाही बरे हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच मिनिट हजर असतो . पंधरा मिनिट होऊन गेले तरी आला नव्हता. रेवतीने बॅगेतून मोबाईल काढला आणि फोन लावू लागली. पण फोन संपर्क क्षेत्राबाहेर होता. तिला वाटले गाडी चालवत असेल किंवा रेंज नसेल.. म्हणून ती तशीच परत वाट पाहत उभी राहिली. अर्धा तास झाले तरी सुहासचा काही पत्ता नव्हता. आता मात्र तिचा जीव घाबरा घुबरा होऊ लागला. तिने परत फोन लावण्याचा प्रयत्न केला.. परत लागला नाही. काही कळण्यास मार्ग नव्हता. हा मुलगा आहे कुठे? ही काय पद्धत