वर्षा मागून वर्ष सरत गेली ...... आणि मी तिची वाट बघत भूतकाळात अडकलो तिच्यात गुंतून गेलो. तिच्या आठवणी माझ्या साठी नव्या बनून परत यायच्या मी त्या रस्त्याच्या वळणावर थांबलेलो जिथे आम्ही शेवटी भेटलेलो . तिला सतत माझे डोळे शोधायचे न हाथ थाम सके , न पकड सके दामन , बडे करीब से उठकर चला गया कोई , आता राहण्याचे ठिकाण , शहर बदलले तरी ह्रदयाच्या एका कोपऱ्यात असं वाटायचं येणार का ती मला शोधत . रात्री आकाशात चांदणे न्याहाळत बसलो मनात हाच विचार येत होता कि माझे हरवलेले उत्तर मला सापडेल का, माझ्या पत्रांना पत्ता सापडेल का