१९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १

  • 10.4k
  • 2
  • 3.1k

१९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १ राजस्थान ही भारतातील अतिशय प्रसिद्ध जागा आहे. लॅंड ऑफ किंग्स म्हणून राजस्थान ओळ्खल जात. इथला इतिहास, किल्ले, इथले राजे, राजवाडे, उंट सगळच जगभर प्रसिद्ध आहे. राजस्थान इथल्या विविश रंगांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच लाखो पर्यटक इथे भेट देतात. राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे उत्तरी भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणार्‍या भाषा आहेत.राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे. इथे उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके,