कळत नकळत...

  • 7.2k
  • 1.4k

रेवती एक चुणचुणीत मुलगी.. टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीत कामाला होती.सतत तिला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी बोलावं लागे,त्यांना माहिती द्यावी लागे.रेवती स्वतः छान कविता करत असे आणि लिहीतही असे अधूनमधून हौस म्हणून.तिचं हे कौशल्यही आॅफिसमधे माहिती होतं.तिच्या सहज बोलण्यातून अनेक लोक प्रभावित होत.कंपनीची मंडळीही तिच्या या स्वभावावर कौशल्यावर खुश होती.तिचा कंपनीतला सहकारी मकरंद.दोघांची विशेष गट्टी आणि छान मैत्री होती. रेवतीचं लग्न ठरलं होतं आशिषशी. रेवती आणि आशिषच्या लग्नाची तयारीही घरात जोरात सुरु होती. रेवती अक्षरशः स्वर्गात वावरत होती.आशिषची कौटुंबिक स्थिती उत्तम.उच्च पदावर लहान वयात नोकरीला असल्याने आर्थिक सुबत्ताही होती. स्वतःचं घर,गाडी,आई वडील आणि हा एकुलता एक. रेवती खुश नसेल तर नवल.. ओळखीतून