इश्क – (भाग ३)

(29)
  • 14.1k
  • 4
  • 7.7k

त्या तरुणीला सोफ्यावर ढकलुन तो दुकानवाला निघुन गेला. कबिरचं डोकं सॉल्लीड ठणकत होतं, त्यातच त्या तरुणीला जिना चढवुन आणल्याने त्याला सॉल्लीड धाप लागली होती. डोक्याला हात लावुन तो खुर्चीत बसतच होता तोच त्याचा फोन खणखणु लागला. चार शिव्या हासडत त्याने फोन उचलला.. “कबिर सर.. रोहन बोलतोय…, काय म्हणतंय गोवा…”धाप लागल्याने कबिरला निट बोलताच येत नव्हते.. “ठिक.. ठिके.. ठिके गोवा…” “अरे काय रे? काय झालं?”, रोहनने काळजीच्या सुरात विचारलं..”अश्या धापा का टाकतोयेस…? एव्हरीथिंग ऑलराईटना?”“एक मिनीटं थांब, मी जरा पाणी पितो आणि मग बोलतो ओके?”, कबिर..“ओके.. ओके, मी होल्ड करतो..”, रोहन म्हणाला टेबलावरचा पाण्याचा जग कबिरने तोंडाला लावला, गटागटा पाणी प्यायल्यावर त्याला