इश्क – (भाग २)

(31)
  • 14k
  • 2
  • 8.8k

कबीर गोवा एअरपोर्टच्या बाहेर आला आणि समुद्राचा खारा, दमट वारा त्याच्या नाकात शिरला. कबीरने डोळे बंद करुन तो वारा शरीराच्या नसा-नसांत भरुन घेतला. शहरांतला तो पेट्रोलचा, पोल्युशन्सचा, कचर्‍याचा, कोंदलेल्या श्वासांचा, गल्लोगल्ली उभारलेल्या हातगड्यांवरील खाद्यपदार्थांचा.. सर्वा-सर्वांपेक्षा वेगळा… काही क्षणच कबीर त्या स्वर्गीय अनुभुतीत होता. त्याची तंद्री भंगली ती टुरीस्ट-टॅक्सीवाल्यांच्या आवाजांनी.“पणजीम..पणजीम.. म्हाप्सा.. म्हाप्सा..” च्या आवाजांनी परीसर गजबजुन गेला. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला, आपली ट्रॉली बॅग ओढली आणि तो टॅक्सीत जाऊन बसला. “सर, फर्स्ट टाईम गोवा?”, ड्रायव्हरने टॅक्सीच्या आरश्यात कबीरकडे बघत विचारलं.कबीर स्वतःशीच हसला आणि मानेनेच त्याने नाहीची खुण केली. कबीरला त्याची शेवटची, सहा महीन्यांपुर्वीची गोवा-ट्रीप चांगलीच लक्षात होती. त्याच्या चार मित्र-मैत्रीणींबरोबर