कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला. गाडीच्या रंगाशीच सार्धम्य सांगणारा काळा कुळकुळीत सॅटीनचा शर्ट, ग्रे रंगाचं स्पोर्ट्स जॅकेट, पायात क्रोकोडाईल शुज, बारीक फ्रेमचा चंदेरी चष्मा आणि जेल लावुन मागे वळवलेले केसं. दाराशीच उभ्या असलेल्या बॉयला व्हॅलेसाठी गाडीची किल्ली देऊन तो क्रॉसवर्डमधील एका कोपर्याकडे वळला. कोपर्यात जमलेली ८-१०च लोकं बघुन त्या तरूणाच्या चेहर्यावरील हास्य किंचीत मावळले.त्याला आलेले बघताच गळ्यात मोठ्ठालं ओळखपत्र, कानाला ब्ल्यु-टूथ हेड्सेट लावून वावरणारा संयोजक टाईप्स एक युवक धावतच दाराकडे आला. “वेलकम कबीर सर.. प्लिज वेलकम..”, तो संयोजक त्या तरुणाशी हातमिळवणी करत म्हणाला.“जित.. अरे काय? इतकीच