इन्स्पेक्टर अजित पाटील...सांगली शहर पोलीस स्टेशन चे नवीन इन्चार्ज म्हणून कालच रुजू झाले होते..अतिशय हुशार ..कर्तबगार आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती...शिवाय मूळचे ते सांगलीचेच असल्यामुळं हा भाग काही त्यांना नवीन नव्हता ............जुन्या नवीन केसेसची माहित करून घेणे आपल्या अखत्यारीत असलेल्या भागाची माहिती करून घेणे..मागचे सगळे रेकॉर्डस् तपासणे अशी किरकोळ कामे सध्या चालू होती...आजच्या डूटीचे काम संपवून निघण्याच्या तयारीत असतानाच एक तरुणी धावत पळत पोलीस स्टेशनमध्ये आली..पोलीस स्टेशनच्या पायरीला ठेचकाळली आणि तिला चक्कर आली असावी बहुदा ..ती बेशुद्ध झाली..... हवालदार धावत आत आले ....त्यांनी साहेबाना हि गोष्ट सांगितली ......लेडीज कॉन्स्टेबल ना बोलावलं आणि त्यांनी त्या तरुणीला आत आणलं ..पाणी