आयुष्य बदलणारा कवडसा- २ निशाला वाटलं होत गौरांग वेगळा आहे पण तिला जाणवलं गौरांग इतरांसारखाच आहे. ह्या अनुभवानी निशा भारतात परतण्या बाबतीत खंबीर झाली. झालेला प्रकार निशासाठी सुखद नव्हता तरी निशा मनोमन हसली. निशाला अजिबात दुःख झाल नव्हत कारण तिच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हती. ह्या आधी सुद्धा अस झाल होत. तिला माहिती होत तिच्या पैश्यांसाठी आणि अमेरिकेत राहता येईल फक्त ह्याच कारणासाठी तिला २-३ मुलांनी लग्नासाठी विचारलं होत. कारण तिला ओळखत असलेल्या सगळ्यांना निशाला लग्न करायचं नाहीये हे माहिती होत. निशाला सुद्धा माहिती होत आता कोणी तिच्याशी लग्न केल तर ते फक्त फायद्यासाठीच. तिचा खर प्रेम असत ह्यावरून तर तिचा