aअसे म्हणतात ‘सत्य’ जरी ‘गुणकारी’ असले तरी ते ‘कटू’ असते आणि ‘असत्य’ जरी ‘गोड’ असले तरी ‘विषारी’ असते. ‘अर्धसत्य’ मात्र आपल्याला हवे तसे मांडता येते, सत्याचा कडूपणा आणि असत्याचे विष आपल्याला हवे तसे कमी अधिक करता येत असते आणि त्यामुळे अर्धसत्य तुलनेने ‘गोड’ आणि ‘गुणकारी’ भासत असते. पण जेव्हा त्या अर्धसत्याची दुसरी बाजू समोर येते तेव्हा मात्र ती निश्चितच कटूही असते आणि विषारीसुद्धा... अशाच एका अर्धसत्याची कहाणी “अपघात” आज शेखरचा अठरावा वाढदिवस होता. तसा त्याच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस होता. सकाळचा वेळ कॉलेजामधील मित्रांबरोबर व्यतीत करून दुपारी सिनेमा आणि मग संध्याकाळी जंगी मेजवानीचे आयोजन केले गेले होते. शेखरचे सगळे