डाक्टरकी-गंगादादा

  • 8.1k
  • 2.4k

#डाक्टरकी गंगाधर गायकवाड....गंगादादा म्हणून सगळीकडे परिचित...व्यवसायानं ट्रकड्रायव्हर.व्यवसाय हा असा आणि नावात दादा म्हटल्यावर असं वाटू शकतं की हा कुणीतरी टपोरी वागणारा माणूस असेल.पण असं अजिबात नव्हतं. माझ्या लक्षात आहे ते गंगादादाचं वत्सल रूप.त्यांच्या मुलीच्या प्रेग्नन्सीच्या वेळी एक दोनदा ते दवाखान्यात आले होते. ग्रामीण भागात भागात स्त्रियांच्या शारीरिक तक्रारींबद्दल अजूनही बरीच उदासीनता आढळते.कुणी पुरुष सोबत आलाही तर तो असतो नवरा .इतर कुणी जर असलाच तर तो पूरूष पेशंटच्या सोबत कधीच नसतो .पेशंट एकटी माझ्याशी बोलत असणार आणि सोबत आलेली व्यक्ती बाहेर बसलेली असते. तिचा संबंध फक्त फी देण्यापुरता... तर असं असताना गंगादादा मुलीसोबत फक्त आतच आले नाहीत तर, सर्व शंका