स्वराज्यसूर्य शिवराय - 15

(16)
  • 5.7k
  • 1
  • 2.5k

शिवराय सुरतेवरून निघाले ते औरंगजेबाला आर्थिक बाबतीत फार मोठा धडा शिकवून. औरंगजेबाच्या मामाने स्वराज्याची जी लुट केली होती त्याचा बदला घेऊन शिवराय निघाले. मनात एक आनंद होता, समाधान होते. ही बातमी केव्हा एकदा माँसाहेबाना सांगावी, सोबतचा सारा ऐवज त्यांच्यापुढे कधी ठेवावा, सारी कथा त्यांना कधी ऐकवावी अशा एका वेगळ्याच अवस्थेत शिवराय राजगडाच्या दिशेने दौडत होते. परंतु येताना जो जोश, जो आवेश मावळ्यांमध्ये होता तो जाणवत नव्हता कदाचित लागोपाठ घडत असलेला प्रवास, सुरत शहरात अविश्रांत केलेली कामगिरी किंवा वाहनांच्या पाठीवरील वाढलेले 'धनाचे' ओझे...... तिकडे राजगडही आतुर झाला होता, उतावीळ झाला होता.