डाक्टरकी-नात

  • 6.5k
  • 2.2k

एक देशभर गाजलेलं बलात्कार प्रकरण झाल्यानंतरच्या काही दिवसात माझ्याकडे आलेली एक केस. 14-15 वर्षांची एक मुलगी आणि तिची आजी क्लिनिकमध्ये आल्या."काय झालं आजी ?""अगं काय नाय बाय.तू माझ्या लेकीसारखी.तुला काय सांगु ?3-4 महिने झाले ,माज्या नातीची पाळी नाइ आली.आता पिशवीत (गर्भाशयात ) लै मळ झाला असल .तेवडी पिशवी साफ करुन दिली अस्ती तर बर झालं अस्तं.तिचं अजुन लगीन व्हायचय ,नंतर प्राब्लीम नको." आजी माझ्याकडे निरमा पावडर उपलब्ध असल्याइतक्या सहजतेने म्हणाल्या आणि मिश्री तोंडात टाकत्या झाल्या.      स्वत:च्या हतबुद्धनेस ला अंमळ सावरत मी म्हणाले ,""अहो आजी असा मळ वगैरे काही होत नसतं.काय नेमकं कारण आहे ते मला तिला तपासल्यावर कळेल्."  आजीच्या नातीला