लाईफझोन ( भाग - 12)

  • 4.6k
  • 2.1k

      संध्याकाळच्या त्या कातरवेळी मी बालकनीत उभी होते . दूरवरून डॅन मला येताना दिसला . मी काही क्षणांसाठी स्तब्धच झाले . हा अचानक इकडे माझ्याकडे कसा ? सर्वकाही ठीक असेल ना ह्यांच्यात ?? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून गेले .डॅन समोर आला तो आपला निरागस चेहरा घेऊनच .' काय रे काय झालं , असा चेहरा का पडलेला दिसतो ? 'तो माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन एकदम ओक्साबोक्शी रडायलाच लागला .  त्याला अस पहिल्यादाच मी रडतांना बघत होते . ' डॅन काय झालं ? सांगशील का ? असा रडू नको अरे .... ' ' जिनी सोडून गेली मला ...... घटस्फोट घ्यायचं ठरवलं