अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 9

  • 5.1k
  • 2.4k

एन एन्काऊंटर विथ द डेथ गॉड्                      'वाघ जाऊन मध्ये दोन - तीन दिवस गेलेत. पण कशातच मन लागत नाहीये...'मी मिस्टर वाघने सांगितलेली ही घटना लिहून काढत होतो...'त्याने या लोकांना का मारले हा प्रश्न अनुत्तरीतच होता. शिवाय ते गिल्टी होते म्हणजे नक्की काय? असा काय त्या सगळ्यांनी गुन्हा केला होता, की मिस्टर वाघने इतके मोठे हत्याकांड रचले? आणि कसे? नवीन, कार्तिक, वरुण सगळे त्याच्यावर नजर ठेवून होते. त्यांच्याकडे फिट केलेल्या ट्रान्समीटर्सचे काय? त्याने हे कसे जुळवून आणले? आणि माऊसर...''शॅ! काहीच टोटल लागत नाही! मी जीभ आवरायला हवी होती. तो नाराज झाला आणि