डाक्टरकी-मन

  • 8.6k
  • 2.5k

मनहल्लीच्या संवेदनाहीन समाजात डॉक्टर म्हणून संवेदनशील असणं त्रासदायक ठरतं.कारण डॉक्टर म्हणजे फक्त शरीराच्या तक्रारींसाठी असतो असंनाही .ग्रामीण भागात काम करताना अगदी नवराबायकोची भांडणं सोडवण्यापासून तर सासुसुनेची दिलजमाई करेपर्यंत सगळ्या गोष्टी घरचा सदस्य असल्याप्रमाणे पार पाडाव्या लागतात.पण जेव्हा खरोखर काही प्रॉब्लेम नसतो फक्त आपलं मन आपलं वैरी होऊन जातं अशावेळी काय समजावायचं? काय बोलायचं ?ह्यावर डॉक्टरांची कसोटी लागते.हल्ली नैराश्याने घेरलेले खूप रुग्ण येतात. अंजना...त्यातलीच एक रुग्ण...सगळं छान !!! माहेरी आणि सासरीही.नवरा व ती स्वतःहीसर्वसामान्य मुंबईकर नोकरदार.नवरा जीव लावणारा...गुणी आणि गोंडस छोटासा मुलगा.ती स्वतःही उच्चशिक्षित, सुंदर , बहूश्रूत अशी.किरकोळ पोटदुखीची तक्रार घेऊन आली होती.नवरा काळजीनं सांगत होता. Madam !कितीही पैसे लागले