स्वराज्यसूर्य शिवराय - 13

(13)
  • 5.8k
  • 2
  • 2.5k

सिद्दी जौहर याच्या विषारी विळख्यातून बुद्धीचातुर्याने, धाडसाने, युक्तीने शिवराय सहीसलामत सुटले. स्वराज्याच्या गळ्याशी आलेले फार मोठे संकट टळले परंतु त्यासाठी बाजीप्रभू देशपांडे याजसारखा पराक्रमी मोहरा कायमचा सोडून गेला हे फार मोठे दुःख शिवरायांना झाले. दुसरीकडे आदिलशाही शिवरायांकडून एकामागोमाग एक होणाऱ्या पराभवाने त्रस्त झाली होती, भयभीत झाली होती. अफजलखानाच्या पाठोपाठ सिद्दी जौहरचा झालेला पराभव जास्तच झोंबत होता.