हर्षदा आज फारच अस्वस्थ होती. तिचा मोठा भाऊ पियुषदादा सैन्यात अधिकारी होता... त्याची तिला फार आठवण येत होती.सीमेवर नव्हता.. शांततेच्या ठिकाणी होता तो तरीही त्याला सुट्टी मिळणं तसं सध्या कठीण होतं. दादाला तिळगूळ,गुळाची पोळी,तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी किती आवडते नं!आत्ताशी जानेवारी सुरु झाला आहे.दादाचा पत्ता आहेच.राखी पाठवतो तसं तिळगूळही पाठवूया का???ती कल्पना हर्षदाने आईला बोलून दाखवली....अग खरंतर एक वर्षाआड संक्रांतीला अनायासे सुट्टी मिळायची त्यामुळे यायचा तो नं.त्यामुळे मी कधी असा विचारच नव्हता केला...आई मला वाटतय फक्त दादापुरता पाठवण्यापेक्षा सर्वांसाठीच पाठवला तर.... अग खुळे दोनएक हजार मंडळीतरी असतील तिथे.एवढ्यांचा तिळगूळ कसा जमेल आपल्याला दोघींना करायला????थांब मी विचार करते.तिला युक्ती