मी अख्ख्या दिवसाचा जमाहिशेब केला तेव्हा बापाची बोलणी, चुकलेले नमस्कार अन मनाची झालेली ओढाताण या पलीकडे हाती काही लागले नव्हते. एकंदरच हे प्रेम किती महाग असते याची पुरती कल्पना आपल्याला पहिल्या दिवशीच आली. त्यामुळे शक्य तर यातून सुटका करून घेणेच फायद्याचे आहे हे आपला मेंदू आपल्याला न चुकता सांगत होता पण मन मात्र भलतीकडेच धावत होते अन खरे सांगतो त्याला आवरण माझ्या बापालापण जमलं नाही. पुढली तीन वर्षे त्याने सगळे उपाय केले, मला बदडून काढले, खुराक कमी केला, घरातली कामे माझ्या मागे लावली, मित्रांना माझ्या विरुद्ध फितवले अगदी सगळे मार्ग अवलंबून पहिले. तसा मी अभ्यासात फारसा हुशार नव्हतो, म्हणून बापाने