डाक्टरकी-आत्महत्या

  • 8.8k
  • 2.4k

आत्महत्या एवढ्यातच झालेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींच्या आत्महत्येनं एक जुनी घटना आठवली.शेखर अतिशय हुशार मुलगा.गावात पहिला आलेला.इंजिनिअरिंग केलं.बस्स दोन महिने जॉब लागण्याची वाट पहावी लागली.एवढंच नैमित्तिक कारण.आकुर्डीला रेल्वेखाली झोकून दिलं स्वतःला. तुकडे झालेलं शरीर पोत्यात भरुन आणलं गेलं.चेहराही बघायला मिळाला नाही. साधासरळ ,हुशार, बऱ्या आर्थिक स्थिती असणाऱ्या घरातला मुलगा. आईवडील रडत रडत एवढाच प्रश्न विचारताहेत... आमचं चुकलं कुठे? काय उत्तर देणार ह्या प्रश्नाचं? आपल्या समाजात काही गोष्टींवर अजूनही वेळीच विचार केला जात नाही हे लक्षात येतंय. की,संवेदनशील मनांना वेळोवेळी त्रास होत असतो.कुणाचा लवकर लक्षात येतो तर कुणाचा लक्षात येईपर्यंत खूप उशीर होऊन जातो. सुरूवातीला जर ह्या हळव्या मनाच्या तक्रारींकडे