हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २

  • 8.1k
  • 3k

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २ प्रेक्षणीय स्थळे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून या व्यवसायाचा येथे बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्या दृष्टीने शासनाने विविध पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपयोगांच्या सेवा, वेगवेगळ्या वाहतूक सुविधा, रस्ते, विमानतळ, संदेशवहन, पाणीपुरवठा, पुरेसा वीजपुरवठा, नागरी सुखसोयी, मनोरंजनाची साधने इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही या व्यवसायाच्या विकासास फार मोठा वाव आहे. बारमाही पर्यटन चालू राहण्याच्या दृष्टीने राज्यशासन प्रयत्नशील आहे. पर्यटन व्यवसायाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरणाला हानी न पोहोचता पर्यटनाशी निगडित पायाभूत सुविधा उभारण्यास खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याविषयी राज्यशासन सकारात्मक विचार करीत आहे. हिमाच्छादित हिमालयीन शिखरे, उष्ण पाण्याचे झरे, नैसर्गिक व मानवनिर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक व मानवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्थळे इ. पर्यटकांची प्रमुख