शेपुची भाजी भुकेने व्याकुळ ' केरबा ' जेवणाची वाट बघत बसला आहे. थोड अंतर सोडुन त्याचा मुलगा ' गोट्या ' अभ्यास करत बसला आहे. तेवढ्यात केरबाची बायको ' द्रोपदी' उर्फ ' धुरपा ' , जेवणाच ताट वाढुन केरबाच्या समोर ठेवते. ताटातील शेपुची भाजी बघुन केरबा संतापतो. केरबा - धुरपे , शेपुची भाजी आवडत नाही हे माहित असुनही का वाढतेस गं ? धुरपा( थोड लाजुन) - अहो पण मला आवडते ना.. केरबा - तुला आवडते म्हणुन मी का खायची ? स्वतः चीच तारीफ करत , धुरपा - माझ्या हातची भाजी खावुन लोक बोटं चोखत बसतात..तुम्हाला