स्वराज्यसूर्य शिवराय - 11

(17)
  • 7k
  • 2
  • 2.8k

अफजलखानाच्या प्रचंड पराभवाचा आदिलशाहीने फार मोठा धसका घेतला होता. का घडले? कसे घडले? अफजलखानासारखा बलाढ्य सरदार केवळ पराभूतच होत नाही तर स्वतःच्या जीवाला मुकतो ह्या गोष्टीवर आदिलशाही दरबार विश्वास ठेवूच शकत नव्हता. पाठोपाठ शिवरायांनी वाई हा प्रांत, कोल्हापूरच्या आसपासचा फार मोठा प्रदेश ताब्यात घेतला असल्याचीही बातमी दरबारात पोहोचली. कोल्हापूर काबीज करून शिवाजी नक्कीच पन्हाळगडावर हमला करणार ही शक्यता लक्षात येताच आदिलशाही जबरदस्त हादरली. आदिलशाही बेगम आणि तिचा पुत्र अतिशय चिंतेत पडले होते. या शिवाजीचा बिमोड कसा करावा, त्याला कसे आवरावे ह्या काळजीत सारे होते. पण शिवराय एका मागोमाग एक धक्के देत होते.