निर्भया - १८. दीपाला कळून चुकलं, की शिल्पाला समजावण्याच्या भरात तिला कळू नये, अशी गोष्ट ती बोलून गेली होती. जर शिल्पाला अर्धवट सत्य समजलं तर ती गैरसमज करून घेईल; "पण शिल्पा अजून लहान आहे. तिला या सगळ्या गुंतागुंतीचं आकलन होईल का? तसं असलं तरी आज अशी वेळ आली आहे की, तिला सगळं समजायलाच हवं. मला सुद्धा माझी बाजू मांडायला परत कधी संधी मिळेल की नाही ; हे सांगता येत नाही." दीपाचं हेलकावे घेत होतं.शेवटी तिने शिल्पाला सगळं सांगायचा निर्णय घेतला.