बर्याचवेळ शांतता.. रंगमंचावरील दिवे पुर्ववत होतात. सुशांत : .तुमचं दिवा स्वप्न संपलं असेल तर.. जरा निट कळेल अश्या शब्दात सांगणार का? केतन आपल्या स्वप्नातुन बाहेर येतो. थोडा सावरायला वेळ गेल्यावर. एक दीर्घ श्वास घेतो. केतन : सांगतो.. सगळं सांगतो.. पण कुठे पचकु नकोस.. (थोड्यावेळ शांतता आणि मग..) इथं येईपर्यंत माझा निर्णय अगदी ठाम होता. मला माहीते इथं तुझ लग्न.. सगळा मस्त माहोल बनलेला, त्यात इतक्या वर्षांनी आईला प्रत्यक्ष भेटणार म्हणजे माझ्या लग्नाचा विचार निघणारच. आणि म्हणुनच मी स्वतःशीच माझं म्हणणं मांडायला लागणारे मुद्दे पक्के करुन आलो होतो. लग्न करीन तर एखाद्या अमेरीकन मुलीशीच..तुला सांगतो दा.. इतक्या हॉट असतात ना तिथल्या