श्यामचीं पत्रें - 10

  • 7.8k
  • 1.9k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज तुला निराळयाच गोष्टीविषयीं लिहिणार आहे. राष्ट्रभाषेविषयीं आज थोंडें सांगणार आहे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी त्याप्रमाणें स्वतंत्र होऊ पाहणा-या हिंदुस्थानला सर्व राष्ट्राची अशी एक भाषा असणें जरूर आहे. त्या त्या प्रांतांतून प्रांतीय भाषा असतीलच, परंतु अखिल भारतीय भाषा हवी.