'पांडुरंग महादेव पवार 'हा गावातील एक पंचविशीतला तरुण .तो नेहमीच चाकरमनी लोकांची वाट पाहणारा. गावात गणेशोत्सव, शिमगा अशा वेळी येणाऱ्या चाकरमान्यांचा शोध घेणारा. प्रत्येकाच्या दारात जाऊन दादा तुमचा अंगण साफ करुन देऊ काय? तुमची पायवाट सरळ करून देऊ काय ? असे विचारुन फक्त पंचवीस -तीस रुपयाची अपेक्षा करणारा आणि चाकरमान्यांच्या पाठी लागणारा. गावात कुणाचं बारसंअसो वा लग्न त्याठिकाणी पांडया हजरच. त्या ठिकाणी जाऊन काहीतरी काम द्या पण, संध्याकाळी पन्नास-शंभर द्या म्हणणारा हा पांडू .त्याच संसाराकड़ अजिबात लक्ष नव्हतं. बाळंतपणात बायको देवाघरी गेलेली.त्याच्या दोन मुलींही मुलींच्या मामाने शिक्षणासाठी आपल्याकडे नेलेल्या होत्या. घरी म्हातारी आई-सवूबाई एकटीच .तीही शेजारची धुणीभांडी करून