श्यामचीं पत्रें - 9

  • 10.7k
  • 2.2k

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. हिंदुस्थानचा प्रश्न मोठा बिकट आहे. कुटिल ब्रिटिश मुस्तद्यांनी तो अधिकच बिकट करून ठेवला आहे. हिंदी संस्थानिकांची एक धोंड स्वराज्याच्या मार्गात सदैव उभी असते. हिंदुस्थानांतील हे बहुतेक संस्थानिक म्हणजे जगांतील एक अजब चीज आहे ! त्यांच्या लीला किती वर्णाव्या? किती सांगाव्या?