बँकेतून निघालो, पार्किंग मध्ये गेलो नजर भर बाईक कडे बघितलं. काय दिमाखात उभी होती माझी वाट पहात. गालातल्या गालात हसलो आणि बाईक स्टार्ट केली. तितक्यात आईसाहेबांचा काॅल थोड्या वेळाने काॅल करतो म्हणत काॅल काटला. घरी पोहचलो तितक्यात आईचा काॅल?. आई पाच मिनिट थांब मी करतो अग काॅलबॅक, मी काॅल कट करणार तितक्यात आई रागाने बोलाली सकाळी ही तसच अन् आत्ता ही तसच! काॅलबॅक करतो. अस म्हणत आईने काॅल कट केला. मी घराचा दरवाजा उघडला आत गेलो हेल्मेट, मोबाईल टेबल वर ठेवून फ्रेश झालो. गरमागरम काॅफी घेऊन मोबाईल उचलला. बघतो तर काय ???? 37 मेसेजेस आणि 59 काॅलस्?? आईचेच होते. काॅफीचा