अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 4

  • 5.8k
  • 2
  • 3k

फ्यू मोअर डेथ्स्     मध्यरात्री कधी तरी विरेन मरण पावला होता. आता हे प्रकरण जास्तच चिघळत जात होते. म्हणून मग कार्तिकने निर्णय घेतला, की विरेनची पोस्टमार्टम इथेच डेंटल हॉस्पिटलमध्ये होईल. त्याला जॉ सर्जरी साठी इथे आणण्यात आले होते. शुद्धीवर आल्यावर र्मालाही इथेच आणले गेले होते. चीफ सर्जन, डीन, चेअरमन, हॉस्पिटल ओनर सर्वांनीनी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना दटावून, धमकी देऊन, भीती घालून गप्प केले गेले. त्यांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हताच. कारण त्यांनी जास्तच आडवे लावले असते, तर त्यांची ओथेरिटी किंवा लायसेन्स कॅन्सल होण्याची भीती होतीच. शेवटी युद्ध पातळीवर हे प्रकरण हाताळले जात होते. आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्रींपर्यंत सर्वच यात लक्ष