अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 3 - अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी

  • 7.1k
  • 1
  • 3k

चेसिंग दि फॅमिली               त्यांनंतर पुढचे काही दिवस मिस्टर वाघ बाबाराव देसाई यांच्या कुटुंब सदस्यांचा पाठलाग करू लागला. कधी त्यांच्याशी भेटून चौकशी करायचा. बाबाराव गेली ७ - ८ वर्षे त्यांच्या नातीच्या मुलीकडे प्रभाकडे राहायचे. परिस्थिती खूपच गरीब. प्रभाचा नवरा शेखर एमआयडीसीतील एका फौंड्रीवर कामाला होता.              फौंड्रीचा मालक  दहादहा - बाराबारा तास काम करून घेऊन कधी कधी ओव्हर नाईटही राबवून घ्यायचा. पण पगार मात्र कधीच वेळेवर नाही. दिला, तर तो ही तुटपुंजा.               हे आधीच त्रिकोणी कुटुंब प्रभा, शेखर आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी संस्कृती. कुटुंब