लाईफझोन ( भाग -1)

(11)
  • 7.5k
  • 3
  • 3.8k

रेवाने मलाच मेल करून का कळवलं असेल हे . मी तिच्या खूप दूर राहते म्हणून की खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून . कामाच्या व्यापात किती दिवस झाले ना ! जवळ जवळ पाच सहा महिने लोटलेत बोलणं झालं नाही आणि रेवा तिनेही आपल्याला कॉल करून विचारलं नाही ह्याच काळात काही घडलं असावं . तेव्हाच तिने असा टोकाचा निर्णय घेतला . मी अनुरागला कॉल करून विचारते . नाही नको उगाच त्याला विचारलं तर तो म्हणेल तुला सांगून तिने मला फसवायचा कट रचला आणि आत्महत्या केली . पण , ती कुठे आहे कसं माहिती करायचं जावं तर मला त्याच्याच घरी लागणार आहे . त्याला कॉल करेल तेव्हाच मी त्याचा घरी पोहचूशकेल ती त्याच्या घरी असावी की काकूंकडे त्यांना रेवा बद्दल माहिती नसणार तर उगाच टेंशन घेतील .