निर्भया- १५. आईच्या विरोधाकडे लक्ष न देता सुशांतने मूल दत्तक घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. त्याला जो दोन वर्षांचा मुलगा-- सिद्धेश आवडला होता त्याच्याविषयी बोलताना संचालक म्हणाले, "त्याचे आई- वडील गेल्या वर्षी झालेल्या भूकंपात दगावले. याची एक पाच वर्षांची बहीण- शिल्पा, इथेच आहे आहे. जेव्हा भावंडं आमच्याकडे असतात, तेव्हा दोघांनाही एकाच घरात दत्तक द्यावे असा अामचा आग्रह असतो कारण त्यामुळे त्यांच्यातले भावबंध कायम राहतात; पण जर तुम्हाला एकच मूल पाहिजे असेल तर तुम्ही इतर मुलांमधून निवडू शकता." पण दीपाला गोबऱ्या गालांची आणि मोठ्या डोळ्यांची गोंडस शिल्पा खूप आवडली होती. "आपण