स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १) सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी कमी झाली होती. राहुल आणि विनोद दोघेही आपापल्या सायकली घेऊन कोणाची तरी वाट पाहत होते. "विन्या, तू निघताना फोन केला होतास न मंदारला? तुला माहितीये न तो नावाप्रमाणेच मंद आहे. सहाला पोचायचे असेल तर तो सहाला बेडमधून बाहेर येतो." - राहुल "अरे हो यार, पाच मिनिटात पोहचतो असे बोलला तो मला. येईल बघ इतक्यात. पण तू रम्याला फोन केलायस न? तो