चुंगड आकाशाला भिडणारा उंचच उंच डोंगर , आणि हृदयाला घर करणारी खोल खोल दरी. आणि या दोन विसंगतीच मिश्रण म्हणजे निसर्गाचं सौंदर्य. एका लयीत पसरलेले कमी अधिक डोंगर, त्यांनी पांघरलेली हिरवळीची शाल. थोड्या थोड्या अंतरावर वाहणारे लहानमोठे धबधबे. बेभान वाहणारा वारा. धुक्यात न्हाऊन निघालेली ही सृष्टी मोहकच. मध्येच कोवळ्या उन्हात दृष्टीस पडणार एखाद कौलारु. दुरवर दिसणार एकट कौलारु बघुन मनात अनेक प्रश्न येतात की हे लोक अस का राहत असतील? आवड म्हणुन , मजबुरी म्हणुन कि आणखी काही.. अशीच एक झोपडी डोंगरउतारावर वार्या पासुन वाचवण्यासाठी जमिनीलगत, जाणिवपुर्वक बनवलेली. आत एक जुनी बाज, एक छोटीशी माचोळी, एक चुल आणि