वैधव्य-स्री जन्माची शोकांतिका

  • 9.2k
  • 3
  • 2.4k

ती ने छान आवरल,चांगली राहीली तर ही आपल्यासाठी उपलब्ध आहे,असा कितीतरी जणांचा समज होतो.आशा नजरा तिला लगेच कळतात.बरेचदा घरातल्यांचीही तिच्याशी वागणूक बदलते.नवरा गेल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने उतरविण्याच जो अघोरी प्रकार होतो,तो पाहीला तरी अंगावर काटा येतो.वाटत ओरडून सांगाव सगळ्यांना बास करा हे सगळ,पण धाडसच होत नाही,पण आता करायला हव.लग्नसमारंभ,पुजा,हळदीकुंकू यासारख्या धार्मिक कार्यक्रमात तर ंबिचारी कानकोंडी होवून जाते,कितीतरी सामारंभात बायकांना हळदीकुंकू लावत असताना,अशा स्रीयांना पाहून लावणाऱ्या पुढे निघून जातात,किंव या स्वतः हून लावू नका म्हणून सांगतात.खरच किती वेदना होत असतील त्यांच्या मनाला.का करायच हे सगळ. लग्नाआधीही आपण नटतोच,साजशृंगार करतोच,मग पतिनिधनानंतर यावर बंधन का ??आपल्या अवतीभोवती अशा कितीतरी घटना आपण पहातो पण बघण्या पलिकडे आपण काहीच करत नाही.