पाना-फुलांचा खेळ

  • 9.6k
  • 1
  • 3.1k

शिवम खूष होतो.त्याची परीक्षा संपते.शिवम तर आपली बॅग घेऊन तयारच असतो.मग ते गाडीत बसून मानखेडला येतात.मानखेड खूप सुंदर गाव असते.हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये वसलेलं.गावाशेजारून एक छोटीशी नदी वाहत असते.छोटी-मोठी घरे,अंगण,गोठा आणि शेत-खळ्यांनी भरलेले असे गाव अगदी परीकथेतीलच वाटत असते.तिथे उंच उंच झाडे असतात.रंगीत रंगीत फळा-फुलांची झाडे शिवमला फारच आवडतात,चालत चालत झाडे पाहत असता शिवम अचानक थांबतो.शिवम पहिल्यांदाच भोपळा पाहत असतो,त्याला वाटत असते की इतके मोठे भोपळे तर उंच झाडावर लागत असतील ,पण भोपळा तर जमीनवर वेलीला लागतो.तो आईला विचारतो, “ये आई भोपळा असा जमीनीवरच्या झाडाला का लागतो?सगळ्या फळांसारखा उंच झाडाला का नाही लागत?” “शिवम काही फळे जास्त वजनाची असतात ती जमीनीवरच्या वेलीला येतात.जसे कलिंगड,भोपळा,टरबूज.आणि काही वजनाने हलकी फळे झाडाला लागतात.