तो विलक्षण प्रवास !

(12)
  • 5.8k
  • 1
  • 2.3k

त्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत होता. सकाळपासून थांबायचं नावच घेत नव्हता. मी जेव्हा मुंबईला जाण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा तर पाऊस आणखी उग्र झाला होता. पण मला थांबून चालणार नव्हतं. मी ट्रेनच तिकीट ऑलरेडी काढलं होतं. काहीही करून मला १ तासात स्टेशनला पोहोचायला हवंच होतं. उद्या पासून पुन्हा ऑफिस सुरु होणार होतं. ५-६ दिवसांची रजा घेतल्यानंतर पुन्हा एक दिवस रजा मला मिळणारच नव्हती. मग पगारातून पैसे कट झाले असते. इच्छा नसतानादेखील मनाविरुद्ध घरच्यांचा निरोप घेऊन मी सिटी बस स्टॅण्डवर आलो होतो. नेमकं भरीस भर म्हणून सिटी बस चा पण त्या दिवशी संप! किती रिक्षावाल्यांना हात केला तरी एक रिक्षा थांबायचं नाव