त्या प्रवासातली ती

(195)
  • 11.4k
  • 46
  • 3.3k

सकाळपासून विजयची जरा धावपळच झाली. दिवाळी ला घरी जायचं प्लॅन केलं होतं आणि त्याआधी कॉलेज मधले सबमिशन पूर्ण करायचे होते. त्यामुळे विजय आणि राजा दोघे मिळेल त्यांच प्रॅक्टिकल बुक घेऊन राहिलेलं काम पूर्ण करत होते. विजय आणि राजा दोघेही औरंगाबाद चे. पण त्यांची ओळख झाली नांदेड च्या नामांकित इंजिनीअरिंग(अभियांत्रिकी) महाविद्यालयात. दोघेही एकाच शाखेत होते आणि एकाच शहरातले म्हटल्यावर आपसूकच मैत्री झाली आणि 3 वर्षात ती अधिकच घट्ट झाली. हॉस्टेल ला एकाच रूम मध्ये राहण्यापासून तर अभ्यास, दंगामस्ती, जेवणं , टवाळखोरी सगळं एकत्रच होऊ लागलं. अर्थातच तेच कॉलेज जीवन असतं आणि हे दोघे त्याचा पुरेपूर फायदा घेत होते. आता दिवाळी ला