पश्चात्ताप आकाशात ढग दाटुन आले होते. प्रकाश अंधारात विलीन होत होता. भयाण शांतता आणि एक प्रकारची रुकरूक लागली होती . अधुन मधुन भेडसावणारा वारा जोरात वाहत होता . आंबराई अंधारात गुडूप झाली होती. अधुन मधुन एखादं कुञ विव्हळत होत. दुर पाणंदीतून वाट काढत रवी एकटाच निघाला होता . शर्ट चे पहिले आणि शेवटचे बटण तुटलेले होते . त्यामुळे गोंगावणार्या वार्या मुळे त्याचा शर्ट एखाद्या फुग्याप्रमाणे फुगला होता . गरजेपेक्षा जास्त वाढलेले केस वार्यावर डुलत होते . ढगाआड लपलेला चंद्र मध्येच बाहेर डोकावत होता . अचानक कुठेतरी विज चमकत होती . एकदाचा रवि आंबराईत पोहोचला . एका आंब्याच्या बुडाला