बम्पी राइड - भाग ३

  • 4.4k
  • 2
  • 1.7k

आता गाडी वेगाने पुढे जात होती. ड्रायव्हरने पहिला पेट्रोल पंप बघितला आणि टाकी भरून घेतली. जवळच्याच एका ठीकठाक हॉटेल मध्ये आम्ही जेवून घेतले. कोणीही कुणाशी बोलत नव्हते. माही परत गाडीत बसलो. आता ए.सी. सुरू केला होता, रेडीयोवर जुनी गाणी परत सुरू झाली होती. पंपावर ड्रायव्हरने गाडी साफ करून धुवून घ्यायला सांगितली होती. त्यामुळे हीच गाडी आताच कच्च्या रस्त्यावरून आली आहे त्याचा मागमूसही राहिला नव्हता. प्रवास सुखकर चालू होता. सगळे थोड्याच वेळात शांत झोपले. उर्वरित रस्ता कसा संपला आम्हाला कळलेच नाही. ड्रायव्हरने गाडी पार्किंग मध्ये लावली. मी सामान उतरवण्यास सुरुवात केली. ते तिघं अजूनही झोपलेच होते. मी मुद्दामचं कोणाला उठवले नव्हते.