मुलांच्या भावविश्वात डोकावताना..

(19)
  • 12.6k
  • 5
  • 3.1k

मुलांच्या भावविश्वात डोकावताना.. लहान मुलांचे भावविश्व खूप वेगळे असते. आपल्याला ते जाणून उमजून घेणे फार गरजेचे असते. जर आपण ते समजून घेतले तरच त्यांचे बालपण कोमेजून जाण्याऐवजी अबाधित राहील. लहान मुले ही मातीच्या गोळ्यासारखी असतात.आपण जसा आकार देऊ तशी ती घडत जातात पण यासाठी त्यांना हाच आकार हवा, हाच आकार त्यांच्यासाठी योग्य आहे, असा अट्टाहास मात्र करू नये. त्यांना त्यांना जसे हवे तसे घडू द्यावे. आपल्याकडे मुलांच्या जन्मांसोबतच त्यांच्या शाळेचा विचार चालू झालेला असतो. पण ह्या सगळ्याचा विचार करत असताना ती केवळ छोटी मुलेच आहेत याचा मात्र आपल्याला विसर पडतो. एखाद्या रोबोसारखे त्या मुलांना वागवले जाते. कदाचित आता चालू असलेली जीवघेणी स्पर्धीही