गिफ्ट

(17)
  • 11.7k
  • 7
  • 3k

(कधीतरी वाचण्यात आलं त्यावरून सुचलेली हि कल्पना) अशोक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मोठा मुलगा. वडिलांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय. घरी आई-बाबा, अशोक आणि  एक बहीण सिमा, अस चौकोनी कुटुंब. वडिलांचा स्वभाव अतिशय व्यावसायिक आणि नीटनेटका. त्यामुळे घरात अनावश्यक वस्तूंचा वापर वर्ज्य. गरजेपक्षा जास्त काहीच नसायचं, त्यामुळे आहे त्यात भागवायची आणि समाधानी राहण्याची सवय अशोक आणि सीमाला लहानपणापासून होती. आता अश्या वागण्यामागे एक कारण हेही होतंच कि यापेक्षा जास्त पैशांचा भार मध्यमवर्गीयांना पेलवत नाही. पण असं हे साने कुटुंब सुखी आणि समाधानी होतं. अशोक लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. नेहमी वेगळं काही करण्याकडे त्याचा कौल असायचा. अगदी वर्गात पहिला नसला तरी पहिल्या पाच मध्ये