ब्लु लव लेटर..

  • 12k
  • 2
  • 2.6k

ब्लु लव लेटर.. लेक्चर्स सुरु झाले होते. सर्वजण क्लास रुम मध्ये असल्याने काँलेज मध्ये भयाण शांतता पसरली होती. तिला उशीर झाला होता. त्यामुळे ती घाई घाईत चालत होती. अचानक तिच्या समोर तो आला आणि ती थबकलीच . तो..तो होता, ज्याने मागच्या काही महिन्यांपासुन तिची झोप उडवली होती. ज्याने तिच्या हृदयावर कब्जा केला होता. ते एकाच क्लास मध्ये होते. पण आजपर्यंत ते एकमेकांना कधीच बोलले नव्हते. ते रोज एकमेकांकडे फक्त चोरुन चोरुन पहायचे. न बोलताही त्यांच्यात एक अनामिक , सुंदर , हळुवार नातं निर्माण झाल होत. तो आज अचानक तिच्या समोर येवुन थांबला होता. तिला ब्लु कलरआवडतो हे त्याने