परदेशी - अनिवासी

  • 4.4k
  • 1.6k

अनिवासी अनिरुद्ध बनहट्टी ‘कल्व्हर्ट टाउन’ मधल्या ‘हेलेना रो’ वसाहतीतल्या ‘टी-34-बॉनव्हिल’ या बैठ्या घरासमोर आपली इलेक्ट्रिक बाईक पार्क करून यू.एस.पोस्टस्च्या कार्ल बेनेटनं बेलचं बटण दाबलं. रमेश कांबळे नं दार उघडलं. “काल देखील मी येऊन गेलो.” कार्ल म्हणाला. “हो,” रमेश म्हणाला, “तुम्ही दाराला लावलेल्या नोटनुसारच आज मुद्दाम घरी राहिलोय्!” सही करून त्यानं पत्र घेतलं. त्याची बायको सुप्रिया नेने बोटाभोवती चावी फिरवत जिन्यानं खाली आली. “कसलं पत्रं आलंय्?” सुप्रिया म्हणाली. “घरून आलेलं दिसतंय!” मी निघते.” जीन्स-टी शर्ट घातलेली सुप्रिया नेने-रमेश कांबळेची बायको लॅचचं दार लावून बाहेर पडली. दोघे एकाच आय.टी. कंपनीत काम करताना एकत्र आले, अन दोघांनी झटक्यात लग्न सुद्धा करून टाकलं! “....कांबळे