४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स..

(12)
  • 12.5k
  • 1
  • 4.5k

४. ताडोबा- लॅंड ऑफ टायगर्स.. वाघ बघण्याची इच्छा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. देशात २६ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत आणि ते विदर्भातच आहेत. यामध्ये मेळघाट, चंद्रपूरचा ताडोबा आणि नागपूरचा पेंच प्रकल्पाचा समावेश आहे. ह्यातले ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असे अभयारण्य आहे. ताडोबाला वाघांचे रण म्हणले जाते. तस पाहता, वाघाला बघायची उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि ते पार्क मध्ये पाहण्यापेक्षा खऱ्या खुऱ्या जंगलात पहायची मजा काही वेगळीच असते. ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य